Tom Latham: आम्ही लगेच एका रात्रीत वाईट...; सलग तिसऱ्या पराभवानंतर टॉम लॅथम संतापला

NZ vs SA: न्यूझीलंडच्या टीमची धुरा सध्या टॉम लॅथमकडे आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. 1 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने निराशा केली.

सुरभि जगदीश | Updated: Nov 2, 2023, 07:52 AM IST
Tom Latham: आम्ही लगेच एका रात्रीत वाईट...; सलग तिसऱ्या पराभवानंतर टॉम लॅथम संतापला title=

NZ vs SA: न्यूझीलंड टीमच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नियमित कर्णधार दुखापतीमुळे काही सामन्यांमधून बाहेर पडला. तर नुकंतच टीमला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. केनच्या अनुपस्थितीत टॉल लॅथमकडे टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा दारूण पराभव केला. यानंत टॉम लॅथमने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये चांगला खेळ केला नसल्याचं सांगितलंय.  

न्यूझीलंडच्या टीमची धुरा सध्या टॉम लॅथमकडे आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. 1 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने निराशा केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून न्यूझीलंडला 190 रन्सने सामना गमवावा लागला. न्यूझीलंडचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. 

पराभवानंतर काय म्हणाला टॉम लॅथम?

आम्ही या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली नाही. त्यांच्या पार्टनरशिपनंतर आमच्यावर दबाव होता. हा खूप मोठा स्कोर होता. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या भागीदारी उभारायच्या होत्या. पण पहिल्या 10 ओव्हर्समध्ये आम्ही काही विशेष करू शकलो नाही. मला वाटतं की, आम्ही पार्टनरशिप बनवू शकलो नाही. दुखापतींसह आम्ही प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला हे निराशाजनक होतं. आम्ही लगेच विचार करू आणि पुढच्या सामन्याकडे वाटचाल करू. आम्ही लगेच एका रात्रीत वाईट टीम बनणार नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून न्यूझीलंडचा पराभव

दक्षिण आफ्रिकेने पहिली फलंदाजी करताना 357 रन्सचा डोंगर रचला. क्विंटन डी कॉकने 114 तर वॅन डेर दुसाँने 133 रन्सची तुफानी खेळी केली. याला उत्तर देताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम अवघ्या 167 रन्सवर ऑलआऊट झाली. ग्लेन फिलिप्सने 60 रन्स करत एकाकी झुंज दिली. पण तो टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक चार विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरलाय.

टॉम लॅथमची पुन्हा खराब कामगिरी

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम गेल्या तीन सामन्यांमध्ये खराब कामगिरी करताना दिसतोय. भारताविरुद्ध 5 रन्स तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ रन्सची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात कर्णधार केवळ 4 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने त्याची विकेट काढली. टॉमने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून नेदरलँडविरुद्ध 53 आणि अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 68 रन्सची खेळी खेळली होती.