SA vs NZ Match Report: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर (South Africa beat New Zealand) तब्बल 190 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने पहिली फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर रचला. क्विंटन डी कॉकने 114 तर वॅन डेर दुसाँने 133 धावांची तुफानी खेळी केली. याला उत्तर देताना न्यूझीलंडचा संपर्ण संघ अवघ्या 167 धावांवर ऑलआऊट झाला. ग्लेन फिलिप्सने 60 धावा करत एकाकी झुंज दिली. पण तो टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक चार विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरलाय.
पॉईंटटेबलमध्ये ऊलटफेर
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पॉईट टेबलमध्ये (World Cup PointTable) मोठा उलटफेर झालाय. दक्षिण आफ्रिका थेट पहिल्या स्थानावर पोहोचली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकिट जवळपास निश्चित झालं आहे. तर टीम इंडिया (Team India) दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दक्षिण आफ्रिकेने सात पैकी सहा सामन्यात विजय मिळवा असून त्यांच्या खात्यात 12 पॉईंट जमा झालेत. तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असेलल्या भारतीय संघाने सहापैकी सहा सामने जिंकले असून भारताच्या खात्यातही बारा पॉईंट जमा झालेत. पण सरर नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट 2.290 इका जबरदस्त आहे. तर भारताचा नेट रन रेट 1.405 इतका आहे.
न्यूझीलंडची पॉईंटटेबलमध्ये घसरण
न्यूझीलंडला पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. न्यूझीलंडची थेट चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला आहे. पॉईंटटेबलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावर आलाय. न्यूझीलंडला सात सामन्यात तीन पराभव पत्करावे लागले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा सहापैकी दोन सामन्यात पराभव झालाय, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खात्यात प्रत्येकी आठ पॉईंट आहेत. पण नेट रनरेटच्या आधारावर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या एक पाऊल पुढे आहे. न्यूझीलंडला आपलं आव्हान टिकवण्यासाठी आता उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
दुसरीकडे बांगलादेशवरील विजयानंतर पाकिस्तान संघाने आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलं आहे. पाकिस्तानने सातपैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून त्यांच्या खात्यात सहा पॉईंट जमा आहेत. पुढचे दोन्ही सामने जिंकले तर पाकिस्तान टॉप फोरमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. पण यासाठी पाकिस्तानला विजयाबरोबर नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे.
टीम इंडियाला जिंकावच लागेल
आयसीसी विश्वचषकात आतापर्यंत अपराजीत राहिलेला संघ म्हणजे भारत. भारतीय क्रिकेट संघाने विजयाचा षटकार लगावला आहे. आता टीम इंडियाचा सातवा सामना गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनलंच तिकिट निश्चित होईल. पण त्याचबरोबर पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया पहिल्या स्थानावर पोहोचेल.