मुंबई : विराट कोहली (virat kohli) टी-20 विश्वचषकानंतर (T20 world cup) टी-20 संघाचं कर्णधारपद सोडत आहे. या मेगा इव्हेंटनंतर रवी शास्त्रीही (Ravi shastri) संघ सोडणार असल्याचे मानले जात आहे. आता बातमी आली आहे की, संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब (Nick Webb) देखील टी-20 विश्वचषकानंतर पदाचा राजीनामा देतील.
निक वेब गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाशी संबंधित आहे. शंकर बासू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते 2019 मध्ये भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक बनले. निक वेब, मूळचे न्यूझीलंडचे आहेत. कोरोना महामारी दरम्यान बराच काळ ते आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. पुढे आता त्यांना कुटुंबापासून वेगळे राहायचे नाहीये. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयला सांगितले आहे की, टी-20 विश्वचषकानंतर त्यांना आणखी कार्यकाळ वाढवून नको आहे.
निक वेब यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, "मी अलीकडेच बीसीसीआयला सांगितले आहे की, मला टी-20 विश्वचषकानंतर करार वाढवायचा नाहीये. हा सोपा निर्णय नव्हता पण कुटुंबापासून अजून दूर राहायचं नाही.'
न्यूझीलंडला जाणाऱ्या प्रत्येकासाठी, यावेळी 14 दिवसांचा क्वारंटाईन कार्यकाळ अनिवार्य आहे. वेब म्हणाले की, "भविष्यात या निर्बंधांमध्ये शिथिलता असेल, परंतु अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे आणि वर्षातून पाच ते आठ महिने कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे मी टी-20 विश्वचषकानंतर या पदावर राहू शकत नाही."
ते म्हणाले की, "भविष्यात काय लिहिले आहे ते माहित नाही पण यावेळी मी रोमांचित आहे." टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन. दोन वर्षांहून अधिक काळ या संघाशी निगडित असणे ही अभिमानाची बाब आहे. आम्ही जिंकलो, हरलो, इतिहास घडवला आणि एकमेकांशी जुडलो. हा संघ विशेष आहे कारण प्रत्येक खेळाडू स्पर्धात्मक आहे.