वर्ल्ड कप पराभव जिव्हारी, टी 20 सोबत वनडे कॅप्टन्सीचा राजीनामा, क्रिकेट विश्वात खळबळ!

Captaincy : टी 20 वर्ल्ड कप पराभावनंतर कॅप्टनचा राजीनामा   

Updated: Nov 21, 2022, 11:27 PM IST
वर्ल्ड कप पराभव जिव्हारी, टी 20 सोबत वनडे कॅप्टन्सीचा राजीनामा, क्रिकेट विश्वात खळबळ! title=

Nicholas Pooran steps down Captain of the West Indies cricket team : नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. दुसरीकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघही सेमीफायनलमध्ये बाहेर पडला होता. विशेष म्हणजे दोनवेळा वर्ल्ड कप विजेत्या संघ वेस्ट इंडिज (West Indies) संघाला सुपर12 मध्येही स्थान मिळवता आलं नव्हतं. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने मोठा निर्णय घेतला आहे. (Trending Nicholas Pooran steps down as the T20I and ODI Captain of the West Indies Senior Mens Team Latest marathi sport news)

टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजची कामगिरी इतकी खराब झाली होती की पहिल्याच सामन्यात त्यांना स्कॉटलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला पण आयर्लंडविरुद्ध पराभव टाळता आला नाही. आयर्लंडनेही वेस्ट इंडिजला पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. 

पोलार्डच्या निवृत्तीनंतर या वर्षी मे महिन्यात निकोलस पूरनची अधिकृतपणे वेस्ट इंडिजच्या पुरुषांच्या पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पूरनने आपल्या कार्यकाळात एकूण 17 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं होतं.

दरम्यान, या स्पर्धेत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत निकोलस पूरनने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. निकोलसने फक्त टी-20 नाहीतर वनडे क्रिकेटचंही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.