FIFA World Cup 2022: इराणमध्ये (Iran) हिजाबविरूद्ध (Hijab) सुरु असलेला विरोधाच्या आंदोलनाची झळ ही कतार फुटबॉल वर्ल्डकपमध्येही (Football World Cup 2022) दिसून आली. आज इराण विरूद्ध इंग्लंड असा फुटबॉल सामना खेळला गेला. यावेळी इराणचे खेळाडू (Iranian Football Player) मैदानावर पोहोचले. मात्र यावेळी त्यांनी देशाचं राष्ट्रगीत म्हटलं नाही. जोवर इराणचं राष्ट्रगीत वाजत होतं तोपर्यंत खेळाडूंच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या भावना दिसून आल्या नाहीत. भावनाहीन चेहरा घेऊन यावेळी सर्व खेळाडू मैदानावर उभे होते. इराणी खेळाडूंचा फोटोही यावेळी सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होताना दिसतंय.
इराण फुटबॉल टीमचा कर्णधार अलीरेजा जहानबख्श (Alireza Jahanbakhsh) ने सामन्यापूर्वी सांगितलं की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांच्या बाजूने राष्ट्रगीत गाण्यास नकार द्यायचा की नाही हे टीममधील खेळाडू एकत्र येऊन ठरवतील.
या विधानानंतर इराणची टीम खलीफा इंटरनॅशनल स्टेडियमवर उतरली. यावेळी आपल्या देशाचं राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर भाव-शून्य होऊन सर्व खेळाडू शांत उभे होते.
या खेळाडूंचं असं शांत उभं राहणं हे इराणी इस्लामी हुकूमतचा विरोध आणि हिजाब विरोधी निदर्शकांना समर्थन असल्याचं मानलं जातंय. फुटबॉलपटूंच्या या वागणूकीमुळे जगात इराणविरोधातील निदर्शनांची आंदोलन आणखी भडकणार असल्याचं म्हटलं जातंय.
कुर्द वंशाची 22 वर्षीय अमिनी हिजाब घालून रस्त्याने चालली होती. इराणच्या इस्लामिक नियमांप्रमाणे, तिने तिचा हिजाब नीट घातला नसल्याचा आरोप केला गेला. या आरोपावरून इराणच्या इस्लामिक पोलिसांनी अमिनीला अटक करून 3 दिवस तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केलं आणि तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून इराणमध्ये कट्टरता नियमा विरोधाची ठिणगी पेटलीये.