INDvsNZ: १७ वर्षांच्या पृथ्वी शॉची फटकेबाजी, वाह-वाह केली किवींनीही...

  न्यूझीलंडचा जलद गती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे कौतुक केले आहे. मुंबईचा हा फलंदाजाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याने सांगितले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 19, 2017, 05:51 PM IST
 INDvsNZ:  १७ वर्षांच्या पृथ्वी शॉची फटकेबाजी, वाह-वाह केली किवींनीही...  title=

मुंबई :  न्यूझीलंडचा जलद गती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे कौतुक केले आहे. मुंबईचा हा फलंदाजाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याने सांगितले. 

पृथ्वीने बोर्ड अध्यक्षीय संघाकडून खेळताना ६६ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात अध्यक्षीय संघाने न्यूझीलंडचा ३० धावांनी पराभव केला. 

बोल्टने मॅचनंतर सांगितले की, मी ऐकले की तो केवळ १७ वर्षांचा आहे. मला विश्वास बसत नाही. तो खूप चांगला खेळला. सुरूवातीला चेंडू चांगला स्वींग होत होता. पण त्याला काहीच अडचण झाली नाही. 

बोल्ट म्हणाला,  सर्व गोष्टी योग्य राहिल्या तर ज्या खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल आहे अशांमध्ये पृथ्वी याचे नाव घेता येईल. पहिल्यांदा पाहिल्यावर मी खूप प्रभावित झालो आहे.  सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या बोल्टने सामन्यात विजय नाही मिळविल्यामुळे निराशा व्यक्त केली. 

सामन्याबद्दल बोलताना बोल्ट म्हटला की आज दुपारी खूप जास्त उष्णता होती. त्याच्याशी जुळवून घेणे  सोपे ठरले परंतु पराभव झाला हे निराशाजनक आहे.