वर्षे बदललंं पण भावाने परंपरा ठेवली कायम, 2022 नंतर 23 च्या सुरूवातीलाही ठोकलं शतक!

स्टार खेळाडूने दाखवला दमखम! सलग दोन वर्षे 'या' खेळाडूचा शतकांचा 'श्रीगणेशा'

Updated: Jan 2, 2023, 07:01 PM IST
वर्षे बदललंं पण भावाने परंपरा ठेवली कायम, 2022 नंतर 23 च्या सुरूवातीलाही ठोकलं शतक!  title=

NZ vs Pak : यंदाच्या वर्षी दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचा 'श्रीगणेशा' झाला आहे. 2 जानेवारीला सुरू झालेल्या कसोटी मालिकेमध्ये पहिल्याच दिवशी थेळाडूने शतक झळकवलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील (PakvsNZ) कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कराची येथे खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूने शतक केलं असून हे यंदाच्या वर्षीचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक आहे. योगायोग म्हणजे मागील वर्षी ज्या खेळाडूने शतक केलं होतं त्याच खेळाडूने 2023 लाही पहिलं शतक झळकवलं आहे. (New Zealand Batsman davon conway become first player who score hundred in 2023 Latest cricket news)

कोण आहे हा खेळाडू?
डेव्हन कॉनवे असं खेळाडू नाव असून तो न्युझीलंडचा आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी शतकी भागीदारी केली. यामध्ये डेव्हन कॉनवे याने चौथं शतक ठोकलं असून 122 धावांवर बाद झाला. या खेळीमध्ये कॉनवेने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. टॉम लॅथमने 71 धावांची खेळी करत मजबूत सुरूवात करून दिली. (Davon Conway Hundread vs Pakistan)

डेव्हनने ठोकलेलं हे शतक खास असून वर्षाच्या सुरूवातीलाच पहिलं शतक त्याने 2022 सालीही केलं होतं. 1 जानेवारी 2022 ला बांगलादेशविरूद्ध माउंट मोंगनाई मैदानावर डेव्हनने 122 धावा केल्या होत्या. यंदाही डेव्हनने शतक करत सलग वर्षाच्या सुरूवातीला शतक करण्याचा विक्रम केला आहे.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या अखेर न्यूझीलंडने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 309 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे वगळता मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ईश सोढी नाबाद 11 धावा आणि टॉम ब्लंडेल नाबाद 30 धावांवर खेळत आहेत.