ICC World Cup 2023 साठी बीसीसीआयनं 'या' 20 खेळाडूंची केली निवड? वाचा

ICC World Cup 2023 Team India: आयसीसीनं एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर 2023 चे नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केली आहे. हा वर्ल्डकप भारतात असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी पाहता बीसीसीआयनं सावध पवित्रा घेतला आहे.

Updated: Jan 2, 2023, 06:20 PM IST
ICC World Cup 2023 साठी बीसीसीआयनं 'या' 20 खेळाडूंची केली निवड? वाचा  title=

ICC World Cup 2023 Team India: आयसीसीनं एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर 2023 चे नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केली आहे. हा वर्ल्डकप भारतात असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी पाहता बीसीसीआयनं सावध पवित्रा घेतला आहे. यासाठी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत 20 खेळाडूंची आयसीसी वर्ल्डकप 2023 साठी निवड केल्याचं चर्चा आहे. या खेळाडूंची येत्या काही दिवसातील कामगिरी पाहून अंतिम 15 खेळाडूंच्या संघात निवड केली जाईल. या पार्श्वभूमीवर 20 खेळाडू कोण असतील, याबाबत अंदाज बांधला जात आहे. क्रीडा समीक्षक आणि समालोचक हर्षा भोगले यांनी 23 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यांच्या मते यापैकी 20 खेळाडूंची नावं अंतिम असतील. 

"माझ्या मते निवड समितीतील सदस्य आणि संघ व्यवस्थापन या नावांची निवड करतील. रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर ही 21 नावं आहेत. रजत पाटीदार आणि उमरान मलिक ही दोन नावं असतील.", असं ट्वीट हर्षा भोगले यांनी केलं आहे. 

 

टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताला गाशा गुंडाळावा लागला होता. इंग्लंडनं 10 गडी राखून विजय मिळवला होता. आशिया चषकातही भारताची कामगिरी सुमार राहिली होती. बांगलादेश विरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर बीसीसीआयने ही बैठक बोलावली होती. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सेक्रेटरी जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए हेड कोच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि पुरुष संघ निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा उपस्थित होते.