IPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार!

Harbhajan Singh On IPL 2023 Playoff: सध्या प्रमुख लढतीमध्ये तीन मोठ्या संघावर हरभजनने विश्वास दाखवला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हरभजनने (Harbhajan Singh On Playoffs) कोणते संघ निवडले पाहा...

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2023, 04:16 PM IST
IPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार! title=
Harbhajan Singh ,IPL 2023 Playoff:

IPL 2023 Playoffs: आयपीएल 2023 चा यंदाचा हंगाम आता दुसऱ्या सत्राकडे वळाला आहे. आत्तापर्यंत 47 लढती पूर्ण झाल्यात. त्यामुळे आता सर्व संघाच्या जेमतेम 5 ते 6 सामने बाकी आहेत. त्यासाठी 'काटे की टक्कर' प्रत्येक सामन्यात पहायला मिळते. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स वगळता अन्य 7 संघात प्लेऑफची चुरस दिसून येतीये. अशातच आता समालोकच हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने प्लेऑफला (Playoffs) कोण पोहोचेल? यावर मोठी भविष्यवाणी केली आहे.

सध्या प्रमुख लढतीमध्ये असलेल्या लखनऊ सुपर जायन्ट्स (LSG), राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या संघावर हरभजनने विश्वास दाखवला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हरभजनने (Harbhajan Singh On Playoffs) कोणते संघ निवडले पाहा...

काय म्हणाला हरभजन सिंह?

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्लेऑफमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर सीएसके व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) पोहोचू शकतात, असं मत हरभजन सिंहयाने व्यक्त केलं आहे. 

सध्याची प्लऑफची स्थिती

सध्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स 12 अंकासह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर लखनऊ आणि चेन्नईला सामना रद्द झाल्याने 1-1 गुण मिळाल्याने आता दोन्ही संघ 11 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. तर मागील वर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानचा संघ 10 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत धावताना दिसतोय. त्याचबरोबर विराटची आरसीबी यंदा चांगली कामगिरी करत असून 10 अंकांसह पाचव्या स्थानी आहे. तर मुंबई आणि पंजाब अनुक्रमे 10 गुणांसह सहाव्या आणि 7 व्या स्थानी विराजमान आहे.

आणखी वाचा - Virendra Sehwag: "तुम्ही कसले आयकॉन? यांच्यावर बंदी घाला...", कोहली गंभीर वादावर विरू चांगलाच भडकला!ट

दरम्यान, मागील वर्षीची फायनलिस्ट आरआरची (Rajastan Royals) टीमने यंदा देखील आपल्या चमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलंय. अटीतटीच्या सामन्यात आरआरने सामने गमावले आहेत. मोठ्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागला नाही. त्यामुळे यंदा राजस्थान प्लेऑफमध्ये असेल, अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.