Khel Ratna Awards 2021: नीरज चोप्रासह आणखी 2 खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

 नीरजसोबत 12 खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

Updated: Nov 13, 2021, 06:44 PM IST
Khel Ratna Awards 2021: नीरज चोप्रासह आणखी 2 खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान title=

नवी दिल्ली: क्रीडा विश्वातून आता सर्वात मोठी अपडेट येत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान करण्यात आला आहे. नीरजचा खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नीरजसोबत 12 खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन, अनुभवी गोलकीपर श्रीजेश पीआर, याशिवाय अवनी लेखरा, सुमित अंतील, प्रमोद भगत, मनीष नरवाल, मिताली राज आणि भारतीय हॉकी टीमचे कर्णधार सुनील क्षीरसागर यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 

23 वर्षांच्या नीरज चोप्राने 87.58 मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर देशात त्याचं वेगवेगळ्या स्तरावर कौतुकही झालं. आनंद महिंद्र आणि चेन्नई संघाकडून देखील त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खेलरत्न पुरस्कार देत नीरजच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 

ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्र यांच्यानंतर इंडिव्हिज्युवल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू ठरला आहे. नीरजच्या कामगिरीचं खूप कौतुक होत आहे.