मुंबई : ICC T20 world cup सेमीफानलमध्ये पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर (Pakistan Team) टीका होतेय. पाकच्या क्रिकेट चाहत्यांचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. ग्रुप मॅचमध्ये सलग विजय मिळवल्यानंतर जे लोक हसन अलीचे (Hasan Ali) कौतुक करताना थकत नव्हते, त्याच टीमच्या खेळाडूला धमक्या येत आहेत. या सामन्यानंतर हसनच्या भारतीय वंशाच्या पत्नीचे नाव अचानक चर्चेत आले आहे.
पाकिस्तानने गटातील सामन्यांमध्ये शानदार खेळ केला. सलग पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठणारा पाकिस्तान हा एकमेव संघ ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या पराभवामागचे कारण हसन अलीला दिले जात आहे. त्याने मॅथ्यू वेडचा (Matthew wade) कॅच सोडला. सामन्यातील पराभवानंतर त्याला पाकिस्तानमध्ये धमक्या येत आहेत.
कोण आहे सामिया आरजू
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी लग्न करणारी सामिया आरजू (Samiya arzoo) ही हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील चांदनी गावची आहे. वडिलांचे नाव लियाकत अली असून ते हरियाणा (Hariyana) सरकारमधील निवृत्त ब्लॉक विकास अधिकारी आहेत. हरियाणातील सामियाने फरिदाबाद येथून शिक्षण पूर्ण केले, तिचे कुटुंब जवळपास दीड दशकांपासून येथे राहत आहे. सामिया व्यवसायाने फ्लाइट इंजिनिअर (flight engineer) आहे.
हसन आणि सामिया कधी भेटले?
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेल्या हसन आणि सामियाची (Hasan ali and samiya arzoo) ओळख एका मित्राने केली होती. या दोघांची दोन वर्षांपूर्वी एका जवळच्या मित्राने दुबईत (Dubai) ओळख करून दिली होती. यानंतर भेटीगाठींचा सिलसिला वाढत गेला आणि मैत्री आणखी घट्ट झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघांनी कुठे लग्न केले
हसनने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी माझा भाऊ आणि वहिनीला भेटलो आणि त्या दोघांशी याबाबत बोललो. माझ्या भावाला सांगितले की मला सामियाशी लग्न करायचे आहे आणि त्याच्या कुटुंबालाही याबाबत कोणतीही अडचण नाही. हसनने 2019 मध्ये दुबईमध्ये एका भव्य समारंभात सामियासोबत लग्न केले होते. सध्या सामिया एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर म्हणून काम करत आहे.