मुंबई: क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची शिफारस खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नीरज चोप्रासह क्रिकेट विश्वातून मिताली राजच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. एकूण 11 खेळाडूंची खेलरत्नसाठी तर 35 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
खेलरत्न पुरस्कार हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे दिला जात होता. मात्र या वर्षी केंद्र सरकारने या नावात बदल केला आहे. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या नावानी हा पुरस्कार यावर्षीपासून दिला जाणार आहे.
खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. यावेळी खेलरत्न पुरस्कारांसाठी 11 जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच स्पर्धा जास्त आहे. त्यामुळे हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी देखील 35 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटर शिखर धवनच्या नावाचाही समावेश आहे.
1. नीरज चोप्रा (भालाफेक)
2. सुमित अंतील (भालाफेक)
3. पीआर श्रीजेश (हॉकी)
4. अवनी लखेडा (शूटिंग)
5. प्रमोद भगत (बॅडमिंटन)
6. कृष्णा नगर (बॅडमिंटन)
7. मिताली राज (क्रिकेट
8. रवी दहिया (क्रिकेट)
9. लोव्हलिना (बॉक्सिंग)
10. सुनील छेत्री (फुटबॉल)
11. मनीष नरवाल (शूटिंग)