मुंबई : टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात काही दिवसांनी वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेनिमित्ताने टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील मुंबई टीमचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. रोहितने गेले काही दिवस बंगळुरुत एनसीएमध्ये दुखापतीवर कसून मेहनत घेतली. आता तो खेळण्यासाठी उत्सूक आहे. 'हिटमॅन' या दोन्ही मालिकेसाठी सज्ज आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा अवघ्या 3 सेंकदाचा व्हीडिओ शेअर केला आहे. (mumbai indians share captain hitman rohit sharma video on facebook)
या व्हीडिओत रोहितने एक खणखणीत फटका मारला आहे. या व्हीडिओला 'पलटण, कसा वाटला हा शॉट?, असं मराठीत कॅप्शन देत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. यावर क्रिकेट चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवघ्या 2 तासांमध्ये या व्हीडिओला 17 हजार जणांनी लाईक केलं आहे.
वनडे सीरिजपासून दौऱ्याला सुरुवात
दरम्यान विडिंजच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही वनडे सीरिजपासून होणार आहे. यानंतर टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वनडे सीरिजमधील 3 सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर टी 20 मालिकेचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डमध्ये करण्यात आलं आहे.
वनडे आणि टी 20 सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे - 6 फेब्रुवारी
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी
टी 20 सीरिज
पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.