IPL 2022 : मुंबईच्या नावावर IPL च्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

प्ले ऑफमधून बाहेर पडताच IPL मध्ये 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या मुंबई टीमच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

Updated: Apr 25, 2022, 08:21 AM IST
IPL 2022 : मुंबईच्या नावावर IPL च्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम title=

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. मुंबई टीम प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. एक दोन नव्हे तर तर तब्बल सलग 8 पराभवांचा सामना मुंबई टीमने केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम पंधराव्या हंगामात मात्र मोठ्या अपयशाचा सामना करत आहे.

मुंबई टीमच्या नावावर अत्यंत वाईट रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. हा रेकॉर्ड कोणत्याच टीमला आपल्या नावावर असावा असं कधीच वाटणार नाही. आयपीएलच्या इतिहासात एवढे वाईट हाल कोणत्याच टीमचे झाले नसावेत जेवढे मुंबईचे पंधराव्या हंगामात झाले. मुंबई हे वर्ष कधीच विसरू शकणार नाही. 

लखनऊ टीमने रविवारी रात्री मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग 8वा पराभव ठरला. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही टीमने पहिले 8 सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएलमधील कोणत्याही टीमचा इतका वाईट रेकॉर्ड नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमनेच हा रेकॉर्ड केला.

हा एकच नाही तर अजून एक लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद मुंबई टीमने आपल्या नावे केली. 6 सामन्यांपेक्षा जास्त सामने हरण्याचा विक्रम मुंबईने केला. डेक्कन चार्जर्स 2008 मध्ये आणि पंजाब किंग्स 2015 मध्ये 7 सामने गमवले होते.

 या लिस्टमध्ये दिल्लीचं नावही आहे. 2014 मध्ये 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. आता या लिस्टमध्ये मुंबई टीमचाही समावेश करण्यात आला. मुंबई टीमने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. पहिल्यांदाच मुंबईला एवढं वाईट अपयश आलं आहे.