धोनीने विराटला असं काही सांगितलं की सामन्याचे चित्रच बदलले

भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशशी लढत होणार आहे. 

Updated: Jun 12, 2017, 10:28 AM IST
धोनीने विराटला असं काही सांगितलं की सामन्याचे चित्रच बदलले title=

ओव्हल : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशशी लढत होणार आहे. 

रविवारी खेळवण्यात आलेल्या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचाच दबदबा राहिला. मग ती फलंदाजी, गोलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण असो. तिन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी चांगली राहिली. 

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना ४३व्या षटकांत कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहकडे बॉल दिला. त्यावेळी कोहली धोनीजवळ स्लिपमध्ये उभा होता. 

तेव्हा धोनीने कोहलीला भुवनेश्वरला बॉल देण्यास सांगितले. ज्यानंतर अखेरच्या क्षणी भुवी फलंदाजीस आला. धोनीचा हा निर्णय योग्य ठरला. भुवनेश्वरने त्या षटकांत सलग दोन बॉलमध्ये दोन विकेट घेतल्या. यामुळेच भारताला त्यांना १९१ धावांवर रोखण्यात यश आले.