भारतीय संघ आमच्यावर दबावर राखण्यात यशस्वी ठरला - डेविलियर्स

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अति महत्त्वाच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. 

Updated: Jun 12, 2017, 10:00 AM IST
भारतीय संघ आमच्यावर दबावर राखण्यात यशस्वी ठरला - डेविलियर्स title=

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अति महत्त्वाच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. 

या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डे विलियर्सने भारताने आमच्यावर दबाव राखण्यात यश मिळवल्याने त्यांना विजय मिळवल्याचे म्हटले. स्पर्धेची अशी सांगता होणे हे आदर्श लक्षण नाही. 

पहिल्या १५-२० ओव्हरमध्ये भारतीय संघाने आमच्यावर दबाव राखला. त्यामुळे विजयाचे श्रेय त्यांना जाते. साधारणपणे आम्ही अशी फलंदाजी करत नाही. आम्ही अनेक विकेट सोप्या गमावल्या, असे डे विलियर्स म्हणाला.