IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 4, 2024, 03:48 PM IST
IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर title=

IPL 2024: येत्या 22 मार्चपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या टीममधील मॅचविनर खेळाडू पहिल्या टप्प्यातील आयपीएमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू बाहेर पडला असून लीग सुरु होण्यापूर्वीच टीमसाठी हा चिंतेचा विषय असणार आहे.

'हा' खेळाडू पडला आपयीएलबाहेर

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. CSK टीमचा स्टार ओपनर डेव्हन कॉनवे आयपीएल 2024 च्या अर्ध्या सिझनमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I सिरीजदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली. दरम्यान याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट खेळू शकला नाही.

न्यूझीलंड क्रिकेटने दिली अपडेट

आता न्यूझीलंड क्रिकेटने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहेत. कॉन्वेच्या दुखापत काही प्रमाणात गंभीर असून लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असं न्यूझीलंड क्रिकेटने सांगितलं आहे. त्यामुळे डेव्हन या दुखापतीच्या शस्त्रक्रियेमुळे 8 आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. त्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीच्या CSK टीमच्या अडचणी वाढल्या जाणार असल्याची शक्यता आहे. 

कशी आहे कॉन्वेची आयपीएलमधील कामगिरी?

चेन्नई सुपर किंगसाठी कॉन्वेने अनेक विजयी खेळी खेळल्या आहेत. यावेळी डेव्हॉन कॉनवेच्या माध्यामातून चेन्नईच्या टीमला अप्रतिम सलामी मिळाली असती. डेव्हॉनला सीएसकेने 1 कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं. कॉन्वेने आयपीएल 2023 मध्ये 16 सामनेत. यावेळी त्याने 6 अर्धशतकं झळकावली आणि एकूण 672 रन्स केले आहेत. 92 रन्स हा त्याचा सर्वोत्तम स्कोर होता. गेल्या सिझनमध्ये तो सर्वाधिक रन बनवणारा तिसरा फलंजाद ठरला होता.

कसा आहे चेन्नई सुपर किंग्जचा स्क्वॉड?

एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, निशांत सिंधु, प्रशांत सोळंकी, महेश थीक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.