मुंबई : आयपीएल 2022 चा सीझन चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super kings) खुपच वाईट ठरला होता. या सीझनमध्ये आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई संघ फायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे आयपीएलमधून लवकर बाहेर पडल्यामुळे आणि चेन्नईचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबतच्या वादामुळे चेन्नई संघ चर्चेत आला होता. या चर्चेनंतर रविंद्र जडेजा चेन्नई संघ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र याच वादावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे. नेमका या वादावर पडदा कसा पडला? कोणी हा वाद मिटवला? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) क्रिकेट फॅन्सना पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी, 10 फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू सोडायचे असतील तर त्यांची यादी सादर करावी लागणार आहे.
दरम्यान अशा परिस्थितीत अनेक संघ आपल्या काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (DC) शार्दुल ठाकूर आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा समावेश आहे.
रविंद्र जडेला संघातच राहणार?
रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघातून बाहेर करण्याची चर्चा असताना, धोनीला मात्र तसे नको हवे आहे. धोनीला (MS Dhoni) पुढच्या मोसमातही जडेजाची साथ हवी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, धोनीने संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, जडेजाला सोडले जाणार नाही. धोनी म्हणाला की, जडेजा हा संघाचा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या जागी कोणीही असू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
आयपीएल 2022 दरम्यान चेन्नईचे टीम मॅनेजमेंट आणि रविंद्र जडेजामध्ये (Ravindra Jadeja) मोठा वाद झाला होता. या वादामुळे तो चेन्नईच्या शेवटच्या सामन्यातून बाहेर झाला होता. त्यानंतर स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर मॅनेजमेंट सोबतच्या वादामुळे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र या वादावर आता पडदा पडला आहे. हा वाद मिटवण्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मोलाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान हा वाद मिटल्यामुळे आता रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा पिवळ्या जर्सीत मैदानात उतरताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.