POINTS TABLE: आज ऑस्ट्रेलियामध्ये एडिलेडच्या मैदानावर न्यूझीलंड विरूद्ध आयर्लंड (NZvsIRE) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारत 35 रन्सचे आयर्लंडचा पराभव केला. (T20 World Cup 2022) या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत 186 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या टीमने चांगली सुरुवात केली. मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. दरम्यान न्यूझीलंडच्या पराभवामुळे ग्रुप 1 च्या सेमीफायनलचं समीकरण (Points Table) बिघडलंय.
न्यूझीलंडचा विजय आणि टी-20 वर्ल्डकपच्या गट 1 मध्ये आयर्लंडचा पराभव झाल्याने पॉईंट्स टेबलचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. न्यूझीलंड टीमच्या विजयामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक फटका बसणार आहे. न्यूझीलंड टीम 5 सामने खेळलीये. यापैकी त्यांनी 3 सामने जिंकले असून 7 पॉईंट्ससह टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
याव्यतिरीक्त दुसरीकडे इंग्लंडच्या टीमने 4 पैकी 2 सामने जिंकलेत आणि 5 गुण आणि +0.547 च्या रनरेटने दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टीम 4 पैकी 2 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र यामध्ये ऑस्ट्रेलियाचा रन रेट मायनसमध्ये आहे.
जर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी क्विलिफाय करायचं असेल तर त्यांना अफगाणिस्तानसोबत होणारी मॅच मोठ्या रन्सच्या अंतराने जिंकावी लागणार आहे. तर ते चांगल्या रनरेटमधून दुसऱ्या स्थानावर क्वालिफाय करू शकतात. तर इंग्लंडला क्वालिफाय करण्यासाठी पुढचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.
आयर्लंडविरुद्धच्या विजयासह न्यूझीलंड ग्रुप मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. या विजयामुळे भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करावा लागणार नाही. कारण भारत सध्या ग्रुप 1 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले असून 6 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर कायम आहे.
6 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केल्यास ते 2 पॉईंट्ससह अग्रस्थानी राहतील. सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडशी होण्याची शक्यता आहे.
ग्रुप 1 मधील अव्वल टीम सेमीफायलनमध्ये ग्रुप 2 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमशी भिडणार आहे. त्याचवेळी, ग्रुप 1 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमचा सेमीफायनलमध्ये ग्रुप 2 मधील अव्वल स्थानावर असलेल्या टीमशी सामना होणार आहे.