श्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य

श्रीलंकेला टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.

Updated: Sep 5, 2017, 06:37 PM IST
श्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य title=

नवी दिल्ली : श्रीलंकेला टीम इंडियाने टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.

मात्र, हा दौरा केवळ भारताच्या ऎतिहासिक विजयासाठीच नाही तर आणखी एका व्यक्तीमुळे नेहमी लक्षात राहिल. त्या व्यक्तीचं नाव आहे महेंद्र सिंह धोनी. सीरीज सुरू होण्याआधी अशी चर्चा होत होती की, धोनी आणि युवराज सिंह याला कदाचित विराट कोहलीच्या नव्या टीममध्ये जागा मिळणार नाही. मात्र, त्यानंतर धोनीने वनडे सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन करत टिकाकारांची तोंडं बंद केली आहेत. 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी श्रीलंका दौ-यात जागा तर दिली. मात्र, जर धोनीचं प्रदर्शन चांगलं नसलं तर त्याला पर्याय शोधावा लागेल, असे व्यक्त केले होते. त्यानंतर धोनीने आपल्या दमदार खेळातून त्यांना उत्तर दिले होते. 

श्रीलंकेत धोनीवर मोठा दबाव होता. पण तरीही त्याने टीम इंडियाला योग्य वेळी मदत केली. त्याने दुस-या, तिस-या आणि चौथ्या वनडेमध्ये अनुक्रमे ४५, ६७ आणि ४९ रन्सची विजय मिळवून देणारी खेळी केली. 

अशात टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एम एस धोनीचं कौतुक करत म्हटलं आहे की, ‘जर टिकाकार त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील तर तो त्याचे उत्तर त्याच्या बॅटने देणार’. 

सौरव गांगुलीने टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ‘धोनी सारखे खेळाडू आपल्या टिकाकारांना नेहमीच चुकीचं ठरवतात. धोनीचं खरं चॅलेन्ज तेव्हा सुरू होईल जेव्हा धोनी मोठ्या टीम्ससोबत खेळणार. मला आशा आहे की, चांगल्या टीम्स विरूद्ध तो त्याचं प्रदर्शन आणखी सुधारेल’.