मी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Updated: Sep 5, 2017, 04:01 PM IST
मी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य title=

चिटगाँग : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीनंतर केलेल्या एका वक्तव्यामुळे शब्बीर सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होतोय.

पुढच्या काही दिवसांमध्ये मी विराट कोहली होऊ शकतो. माझी विराटबरोबर तुलना होऊ शकत नाही, पण मी असंच खेळत राहिलो तर मी पुढचा विराट कोहली होईन, असं शब्बीर म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शब्बीर अपयशी ठरला होता. त्यामुळे या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी शब्बीरवर दबाव होता.

रन बनवायचे असतील तर तुम्हाला स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास असणं गरजेचं आहे. जर आपण विकेटवर टिकलो तर कुठेही रन बनवता येऊ शकतात. असंही शब्बीर म्हणालाय.