महेंद्रसिंह धोनीकडून MI च्या बॉलरला खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ

मुंबईने 5 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला आणि त्यापाठोपाठ चेन्नई प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली.

Updated: May 14, 2022, 03:16 PM IST
महेंद्रसिंह धोनीकडून MI च्या बॉलरला खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : महेंद्रसिंह धोनीला कॅप्टन कूल म्हणून ओळखलं जातं. कॅप्टन कूल नेहमीच खेळाडूंना बुस्ट करत असतो. मुंबई टीमच्या बॉलरने चेन्नईच्या फलंदाजांना घाम फोडला. मॅच संपल्यानंतर धोनीने मुंबईच्या बॉलरला खास गिफ्ट दिलं. याचा आनंद त्याला एवढा झाला की तो आनंदाने उड्या मारत जात होता. 

मुंबईने 5 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला आणि त्यापाठोपाठ चेन्नई प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली. मुंबईचा बॉलर कुमार कार्तिकेयला महेंद्रसिंह धोनीने खास गिफ्ट दिलं आहे. मुंबईच्या विजयात त्याचं मोठं योगदान आहे. कार्तिकेयने 22 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. तर चेन्नईचा डाव 97 धावांवर आटोपला. 

कार्तिकेयला धोनीने खास सल्लाही दिला. याशिवाय त्याला बॉलवर ऑटोग्राफ दिली. हे गिफ्ट पाहून कार्तिकेयचा आनंद गगनात मावत नव्हता. धोनीनं दिलेल्या गिफ्टचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. याचा व्हिडीओ मुंबई टीमने ट्वीटरवर शेअर केला आहे. 

कार्तिकेय ड्रेसिंग रूममध्ये जाताना दिसला. त्याच्या हातात धोनीने ऑटोग्राफ करून दिलेला बॉल दिसत आहे. कार्तिकेयने चेन्नईच्या फलंदाजांची चांगलीच दांडी गुल केली. मुंबईने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला आहे.