MS Dhoni Wife Sakshi: टीम इंडियाला दोन आयसीसी वर्ल्डकप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपलं आयुष्य खूप वैयक्तिक ठेवतो. तो सोशल मीडियावरही नाही आणि मीडियासमोरही फारसा येत नाही. पण याउलट त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते.
साक्षी सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर सतत एक्टिव्ह असते. तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी ती काहीही करू शकते, याचा खुलासा खुद्द धोनीनेच केला आहे. धोनी आणि साक्षीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
या व्हिडिओमध्ये धोनी आणि साक्षी यांच्यात मजेशीर पद्धतीने भांडण झालं आहे. यादरम्यान व्हिडिओमध्ये आजूबाजूला अनेक लोकंही दिसतायत. साक्षी इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सर्व करत असल्याचं धोनी व्हिडिओमध्ये सांगतोय.
तर साक्षीनेही या प्रकरणावर आपली बाजू मांडताना धोनीशी भांडण केलंय. साक्षी म्हणते की, तुझे चाहतेही तुझ्याइतकेच माझ्यावर प्रेम करतात. हे ऐकून धोनी आणि इतरही हसायला लागले.
.@msdhoni : Dekho aapne Instagram ke followers badhne ke liye, ye sab kar rahe hai... @SaakshiSRawat : All your followers love me also no..
Check out the hilarious convo here!#Dhoni #Sakshi #MahiWay pic.twitter.com/B0VNZ4mUOH
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 30, 2020
धोनी या व्हिडिओमध्ये म्हणतो, 'तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी ती इन्स्टाग्रामवर असं करते.' यावर साक्षी म्हणते, 'तुझे फॉलोअर्सही माझ्यावर प्रेम करतात.
धोनीच्या फॅन पेजवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यावर युजर्सकडून विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. फॉलोअर्स वाढवण्यासाठी साक्षी धोनीचा वापर करत असल्याचं काही युजर्सने म्हटलं आहे.
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने 350 एकदिवसीय, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये 17266 रन्स केले आहेत.