Mohit Sharma : चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) यंदाच्या आयपीएलचं ( IPL 2023 ) जेतेपद पटकावलं असून यंदाच्या सिझनमध्ये युवा खेळाडूंसोबत काही जुन्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. यावेळी गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) मोहित शर्माचं ( Mohit Sharma ) नाव चांगलंच चर्चेत आहे. मोहितच्या या उत्तम खेळीनंतर आता तो टीम इंडियामध्ये ( Team India ) कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसतेय.
यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) मोहित शर्माने ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्सकडून ( Gujarat Titans ) 14 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या उत्तम परफॉर्मन्सनंतर त्याचं नाव सध्या फारच चर्चेत आहे. 2015 साली वनडे वर्ल्डकपनंतर मोहित शर्मा ( Mohit Sharma ) एकदम गायब झाला होता. अखेर 8 वर्षानंतर त्याने गुजरातच्या टीममधून कमबॅक केलंय. त्याची उत्तम गोलंदाजी पाहता, आता तो टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करणार का, असा प्रश्नही सर्वांच्या मनात आहे.
गेल्या वर्षी देखील मोहित ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्सच्या ताफ्यात होता. 2022 मध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma ) गुजरात टायटन्ससाठी नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. मात्र यंदाच्या सिझनमध्ये मोहितने स्वतःच नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. येत्या जुलैमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत पाच सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये मोहित शर्माच्या ( Mohit Sharma ) नावाचा विचार केला जाऊ शकतो.
आयपीएलमध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma ) चेन्नईकडून देखील खेळला होता. एका वर्षापूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना मोहित शर्मा ( Mohit Sharma ) म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीचा बराच मोठा काळ हा आयपीएल आणि माही भाईच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमसोबत खेळलाय. 2013-2016 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जकडून ( Chennai Super Kings ) खेळणं हा माझ्या कारकिर्दीतील एक सुवर्णकाळ होता. मात्र वातावरणाबद्दल म्हणायचं झालं तर गुजरातच्या टीमचं सर्वोत्तम आहे.
मोहित शर्माने ( Mohit Sharma ) टीम इंडियासाठी आतापर्यंत 26 वनडे आणि आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 37 विकेट्स घेतलेत. ऑक्टोबर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचा शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मोहितने 100 सामन्यांमध्ये 23.79 च्या सरासरीने 119 विकेट घेतल्या आहेत.