हसीन-शमी वादात शमीच्या काकांची उडी...

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीचे वाद सध्यात चर्चेत आहेत. सातत्याने आरोप-प्रत्यारोप चालू असताना त्यातून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. 

Updated: Mar 20, 2018, 05:35 PM IST
हसीन-शमी वादात शमीच्या काकांची उडी... title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीचे वाद सध्यात चर्चेत आहेत. सातत्याने आरोप-प्रत्यारोप चालू असताना त्यातून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. 

अनैतिक संबंध, मारहाण, मॅच फिक्सिंग यांसारखे गंभीर आरोप त्याच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत. मात्र शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

या वादाला एक नवे वळण लागेल ते म्हणजे पाकीस्तानी मुलगी अलिश्बा हीने दिलेल्या माहितीमुळे. तर आता या प्रकरणात मोहम्मद शमीचे काका खुर्शीद यांनीही उडी घेतली आहे. यात त्यांनी शमीचे बाजू घेत हसीनवर आरोप केले आहेत.

शमीचे काका म्हणाले की, हसीन, शमीच्या पैशांनी प्रत्येक महिन्याला लाखोंची शॉपिंग करते. आता ती खूप काळापासून शमीपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे ते म्हणाले की, हसीनला फक्त पैसा हवाय. आम्ही तिच्या वकीलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर करून हवी आहे. 
पैशांसाठी तिने हे सर्व केल्याचे आरोप शमीच्या काकांनी हसीनवर केले आहेत.