IPL 2023, MI vs PBKS: आयपीएलमध्ये (IPL 2023) बुधवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगणार आहे. मोहालीच्या आयएएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना रंगणार असून मुंबईची टीम गेल्या सामन्याचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पंजाबविरूद्धच्या (Punjab Kings) हा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित शर्मा (Rohit sharma) करणार आहे, त्यामुळे कदाचित कर्णधार प्लेईंग 11 मध्ये देखील बदल करू शकतो.
रोहित शर्मासाठी आजचा सामना खूप खास असणार आहे. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळतानाचा हा रोहितचा 200 वा सामना असणार आहे. दुसरीकडे मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून यामधील 4 सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आलाय. मुंबईचे एकूण 8 पॉईंट्स असून पॉईंट्स टेबलमध्ये ही टीम सातव्या क्रमांकावर आहे.
पंजाबविरूद्ध झालेल्या गेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा दारूण पराभव केला होता. त्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 214 रन्सची खेळी केली होती. तर प्रत्युत्तरात मुंबईला 201 रन्सचा टप्पा गाठता आला होता. त्यामुळे हा सामना जिंकून मुंबईला बदला घेण्याची चांगली संधी आहे.
पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईची टीम ओपनिंग जोडीमध्ये बदल करणार नाहीये. यावेळी रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजीला उतरतील. यानंतर सूर्यकुमार यादव, टीम डेविड, तिलक वर्मा आणि कॅमरून ग्रीन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
पंजाबविरूद्धच्याच सामन्यात अर्जुनला फलंदाजांनी चोपलं होतं. अर्जुनच्या एका ओव्हरमध्ये 31 रन्स मारले होते. त्यानंतरही अर्जुनला संधी देण्यात आली. मात्र राजस्थान विरूद्धच्या सामन्यात अर्जुनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी अरशद खानला संधी देण्यात होती आणि त्यावेळी अर्शदनेही चांगला खेळ केला. त्यामुळे आजच्या सामन्यात अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, अथर्व तायडे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर,अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, आणि कगिसो रबाडा
मुंबई इंडियंस: रोहित शर्मा (कप्तान), सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन, अरशद खान, पीयूष चावला, ईशान किशन (विकेटकीपर), कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर आणि राइली मेरेडिथ