IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल

मुंबईला (Mumbai Indians) आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला (Lucknow Super Giants) पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Updated: Apr 16, 2022, 04:04 PM IST
IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (16 एप्रिल) डबल हेडरचा थरार पाहायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिला आणि हंगामातील 26 वा सामना मुंबई विरुद्ध लखनऊ (MI vs LSG) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. (mi vs lsg ipl 2022 mumbai indians and lucknow super giants teams are 1 changes in playing eleven fabian allen)

मुंबईला आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर लखनऊचा विजयाच्या मार्गावर परतण्याचा मानस असेल. 

या सामन्यात दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे.  मुंबईने बासिल थम्पीच्या जागी फॅबियन एलेनला (Fabian Allen) संधी दिली आहे. तर लखनऊने कृष्णप्पा गौतमच्या जागी मनीष पांडेला संधी दिली आहे.

मुंबई टीम मॅनेजमेंटने फॅबिएनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या संधीमुळे फॅबिएन एलनचं आयपीएल पदार्पण ठरलंय. कायरन पोलार्डने हडल टॉक दरम्यान फॅबिएन एलनला कॅप दिली. यानंतर एलनने हात जोडून सर्वांचे आभार मानले.

पॉइंट्सटेबलमध्ये कोण कुठं? 

आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत.  लखनऊने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे लखनऊ 6 पॉइंट्ससह 5 व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई शून्यासह पॉइंट्ससह शेवटच्या स्थानावर आहे.

मुंबई प्लेइंग इलेव्हन:  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टाइमल मिल्स.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन:  केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवि बिश्नोई.