IPL 2022 | 'पलटण'चं ठरलं! चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी?

मुंबई चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीममध्ये बदल करु शकते.  टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला  (Arjun Tendulkar) संधी देऊ शकते. 

Updated: Apr 21, 2022, 05:16 PM IST
IPL 2022 | 'पलटण'चं ठरलं! चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी? title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 33 वा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईला या सामन्यात पहिल्या विजयाची संधी आहे. तर चेन्नई दुसऱ्या विजयाची संधी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. (mi vs csk ipl 2022 sachin tendulkar son arjun tendulkar might be debut against chennai super kings)

मुंबई चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीममध्ये बदल करु शकते.  टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला  (Arjun Tendulkar) संधी देऊ शकते. अर्जुनला संधी मिळाल्यास त्याचं आयपीएल पदार्पण ठरेल.

अर्जुनला संधी मिळणार? 

मुंबईला सलग 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जसप्रीत बुमराह हा मुंबईच्या बॉलिंग ग्रृपचा प्रमुख आहे. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहीये. त्यामुळे टीम मॅनेजमेंट अर्जुनला संधी देऊ शकते. अर्जुन मुंबईचा हिस्सा आहे. मुंबई फ्रँचायजीने मेगा ऑक्शनमध्ये अर्जुनला 30 लाख रुपयात टीममध्ये घेतलं होतं.

मुंबईला अखेरचा चान्स

मुंबईला या मोसमातील सलग 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचा आजही चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला, तर मुंबई 15 व्या मोसमातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरेल. त्यामुळे या सामन्यात मुंबईला कोणत्याही परिस्थितीत विजयाची आवश्यकता असणार आहे.