IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL) आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना चेन्नई सुपर किंग्सशी (CSK) होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडलकरचा (Arjun Tendulkar) एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सच्या सरावाचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
हा व्हिडिओ पाहून अर्जुन तेंडुलकर लवकरच मुंबई इंडियन्स संघात डेब्यू करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या व्हिडिओत नेमकं काय?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा असलेला अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाज करतो. त्याच्या बॉलिंगचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्जुनने टाकलेला एक भन्नाट यॉर्कर पाहिला मिळत असून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या यॉर्करने मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज इशान किशनची चक्क दांडी गुल केली. ईशान किशनला काही कळायच्या आतच अर्जुनने टाकलेला चेंडू ऑफस्टंप उडवतो.
अर्जुन गेल्या काही काळापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळाली नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केलं. आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा संघ सहा सामने हरला आहे. अशा परिस्थितीत संघ अर्जुनला संधी देऊ शकतो.
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त मुंबईचा इतर कोणताही गोलंदाज अद्याप प्रभाव दाखवू शकलेला नाही. अशात डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.