पाकिस्तानात काय करतोय रोहित शर्मा, क्रिकेटप्रेमी फोटो पाहून हैराण

रोहित तिथं पोहोचला कसा, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 

Updated: Sep 29, 2021, 11:21 AM IST
पाकिस्तानात काय करतोय रोहित शर्मा, क्रिकेटप्रेमी फोटो पाहून हैराण title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  मुंबई इंडियन्सच्या संघाची आयपीएलमधील कामगिरी बेताचीच सुरु असताना आता संघाची धुरा असणाऱ्या रोहित शर्मा म्हणे एका भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचला आहे. हे ठिकाण अनेकांसाठीच अनपेक्षित असल्यामुळं मुळात रोहित तिथं पोहोचला कसा, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. रोहित ज्या ठिकाणी पोहोचलाय ते ठिकाण आहे पाकिस्तान. (Mi cricketer Rohit Sharmas doppelganger takes internet by storm see photo )

तुम्हालाही पडला ना प्रश्न की, हा नेमका तिथे करतोय तरी काय? तर, हा काही प्रत्यक्ष रोहित शर्मा नसून, हुबेहूब त्याच्याचसारखा दिसणारा एक तरुण आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावरील या फोटोमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असणाख्या एका दुकानापाशी बसून आलू बुखारा म्हणजेच प्लम सरबत पीत आहे. सनग्लासेस आणि टोपी घातल्यामुळे तो हुबेहूब रोहितसारखाच दिसत आहे. शीराज हसन नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला. 'कोण म्हणतंय पाकिस्तान आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी सुरक्षित नाही, आताच भारतीय खेळाडू रोहित शर्मा याला आलू बुखारा सरबताचा आनंद घेताना पाहिलं, रावळपिंडीतील सद्दर येथे...'

आयपीएलमध्ये संघाच्या वाट्याला पराभवच येत असल्यामुळं रोहितला सध्या अशाच एखाद्या ब्रेकची गरज आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. इतकंच नव्हे, तर या फोटोचे असंख्य मीम्सही तयार करण्यात आले. नेटकऱ्यांनी तर हा फोटो पाहिला, पण आता रोहित हा फोटो पाहून त्यावर कसा व्यक्त होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.