व्हिडिओ : धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन...

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने महेंद्र सिंग धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन केले.

Updated: Jul 7, 2018, 01:04 PM IST
व्हिडिओ : धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन... title=

मुंबई : इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने महेंद्र सिंग धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन केले. घडाळ्यात १२ वाजताच टीम इंडियाचे सेलिब्रेशन सुरु झाले. आज धोनीचा ३७ वा वाढदिवस आहे. दोन केक कापून माहीने बर्थडे सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनमध्ये फक्त टीम इंडियाच नाही तर धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील होत्या.

धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो केक कापताना दिसत आहे. झिवा टेबलावर बसली आहे आणि आजूबाजूला टीम इंडियाचे खेळाडू.

धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनीचा बायोपिक 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चा लवकरच सीक्वल येणार आहे. आयपीएल कॉन्ट्रोवर्सी, मुलगी झिवा, क्रिकेटच्या दोन फॉर्मेटमधून घेतलेली निवृत्ती यावर सिनेमा आधारित असणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुढच्या वर्षी या सिनेमच्या शूटिंगला सुरुवात करेल.