नवी दिल्ली : इंडियन क्रिकेट टीममध्ये सध्या महेंद्र सिंह धोनीचं स्थान सर्वात वरचं आहे. भलेही अनेकदा त्याच्या खेळावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असतीलही, पण याने त्याच्या फॅन्सवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
त्यांच्यासाठी धोनी हा महानच आहे. त्यामुळेच त्याचे फॅन त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात. मोहाली वनडेमध्ये एका फॅन्सने असेच काही केले.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी टीम इंडिया मैदानात आली आणि रोहित शर्माच्या दुहेरी शतकाच्या मदतीने टीमने ३९२ चा स्कोर उभा केला. धोनीही आज त्याला मिळालेल्या वेळेत ठिक खेळ करुन गेला. नंतर श्रीलंकेची टीम फलंदाजीसाठी मैदानात आली. याच दरम्यान महेंद्र सिंह धोनीचा एक फॅन अचानक मैदानात आला. तो धावत धोनीकडे आला.
धोनी किपिंग करत असताना तो फॅन धावत धोनीकडे आला. आणि तो धोनीच्या थेट पाया पडला. त्याने धोनीकडे ऑटोग्राफ मागितला. पण नंतर गार्डने त्याला पकडून मैदानाबाहेर केले.
हे पहिल्यांदाच झाले असे नाही. धोनीच्या फॅन्सनी अनेकदा असे केले आहे. याआधी त्याच्या एका फॅनने आयपीएल आणि दुस-या सामन्यांमध्ये असे केले आहे.