MS Dhoni: चेहऱ्यावर ना आनंद ना दु:ख; डोळे बंद पण धोनीला सामन्याचा नूर समजला, पाहा Video

MS Dhoni Emotional Video: सामन्याच्या अखेरीस धोनीचा चेहरा भावना शुन्य दिसत होता. चेहऱ्यावर ना आनंद न दु:ख. अखेरच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी डोळे बंद करून बसला, जणू काही त्याला सामन्याचा नूर समजला होता.

सौरभ तळेकर | Updated: May 30, 2023, 03:41 AM IST
MS Dhoni: चेहऱ्यावर ना आनंद ना दु:ख; डोळे बंद पण धोनीला सामन्याचा नूर समजला, पाहा Video title=
Mahendra singh Dhoni

CSK vs GT, IPL 2023 Final: रात्री उशिरापर्यंत झालेल्या फायनल सामन्यात अखेर एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सचा पाच विकेट राखून पराभव केला अन् पाचव्यांदा सीएसकेने (CSK) आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा होत्या कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्याकडे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 215 धावाचं डोंगरा एवढं आव्हान दिलं होतं. पावसामुळे मिळालेलं 171 धावांचं आव्हान पार करताना चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) ने अखेरच्या बॉलवर दमदार विजय नोंदवला.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. अखेरच्या दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं. अखेरच्या ओव्हरमध्ये कॅमरा ज्यावेळी धोनीकडे वळाला त्यावेळी त्याच्या चेहरा भावना शुन्य दिसत होता. चेहऱ्यावर ना आनंद न दु:ख. अखेरच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी डोळे बंद करून बसला, जणू काही त्याला सामन्याचा नूर समजला होता. 

आणखी वाचा - IPL 2023 Final: गुरु धोनीकडून शागिर्द पांड्याचा कार्यक्रम; पाचव्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव!

जडेजाने दमदार फोर खेचला आणि चेन्नई पुन्हा एकदा चॅम्पियन झाली. धोनीने विजयानंतर कोणत्याही भावना व्यक्त केल्या नाहीत. आरामात उभा राहिला आणि सर्वांना अभिवादन केलं. मात्र, त्यावेळी रविंद्र जडेजा ज्यावेळी धोनीजवळ आला त्यावेळी धोनीच्या भावना अनावर झाल्या. धोनीने जडेजाला उचलून घेतलं, त्यावेळी धोनीचे डोळे पाणावल्याचं अनेकांना जाणावलं. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (MS Dhoni Emotional Video) होत आहे.

पाहा Video

दरम्यान, मोहित शर्माने सटीक बॉलिंग करत चेन्नईला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मैदानात आलेल्या धोनीला देखील मोहितने गोल्डन डकवर बाद केलं. आऊट झाल्यावर धोनी देखील शॉक झाल्याचं दिसून आलं. संपूर्ण मैदानात एकच शांतता पसरली होती.