CSK Vs GT, IPL 2023 Final: प्रेक्षकांनी खचाखच भरलं स्टेडियम, गुजरातने दिलेलं तगड आव्हान आणि सामन्यात पावसाचा सुरू झालेला लपंडाव, अशा सर्व समीकरणात चेन्नईने (CSK) यंदाचं आयपीएल विजेतेपद (IPL Champion) पटकावलं आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 215 धावाचं डोंगरा एवढं आव्हान दिलं होतं. पावसामुळे 171 धावांचं आव्हान पार करताना चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. अखेरच्या दोन बॉलवर 10 धावांची गरज असताना खणखणीत सिक्स आणि फोर खेचत रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) धोनीच्या (MS Dhoni) हातात ट्रॉफी दिली.
पावसामुळे सामना होणार की नाही, असं वाटत असताना परीक्षकांनी अखेर हिरवा कंदिल दिला आणि सामना पुन्हा सुरू झाला. मात्र, सामना 15 ओव्हरचा करण्यात आला. चेन्नईला 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं टार्गेट देण्यात आलं. त्यानंतर मैदानात असलेल्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हिड कॉन्वे (Devon Conway) यांनी हल्लाबोल सुरू केला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये चेन्नईच्या 50 धावा पूर्ण झाल्या होत्या. नूर अहमदने गुजरातला पहिली विकेट मिळवून दिली. कॉन्वे देखील पाठोपाठ बाद झाला. पहिल्या 9.1 बॉलमध्ये चेन्नईने 100 धावा पूर्ण केल्या. मात्र, हार्दिकने फिरकीचा मारा सुरूच ठेवला. आता सामना रंगतदार स्थिती आला होता.
एकीकडे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सामना काढणार अशी स्थिती असताना पांड्याने मोहित शर्माकडे (Mohit Sharma) बॉल सोपवला. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने रहाणेला तंबुत पाठवलं. मात्र, शिवम दुबे मैदानात पाय रोवून उभा होता. रहाणे बाद झाल्यानंतर त्याने आक्रमण सुरू केलं. अखेरच्या 3 ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 38 धावांची गरज होती. मोहित शर्माच्या रायडू आणि धोनीला गोल्डन डकवर बाद करत गुजरातच्या खेम्यात आनंद लुटला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत जडेजाने चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं.
Two shots of excellence and composure!
Finishing in style, the Ravindra Jadeja way #TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/EbJPBGGGFu
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईची गोलंदाजांची तारंबळ उडाली. गुजरातकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल (Shubman Gill) आणि वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यांनी आक्रमक फटकेबाजी करत पहिल्या 6 ओव्हरमध्ये 62 धावा केल्या. त्यामुळे गुजरात मोठी धावसंख्या उभी करणार याची कल्पना धोनीला देखील आली असावी. त्याचवेळी धोनीने स्पिनरला गोलंदाजी दिली. जडेजाने पहिल्याच ओव्हरमध्ये घातक अशा शुभमन गिलला पवेलियनला पाठवलं. धोनीच्या सटीक स्टंपिंगमुळे शुभमन लवकर बाद झाला. त्याने 39 धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेल्या साई सुदर्शन (Sai Sudharsan) याने कहर केला.
वृद्धिमान साहा याने एका बाजू लावून धरली. त्यावेळी साई सुदर्शनने धावगती कमी होऊ दिली नाही. त्याने फोर आणि सिक्सचा सपाटा सुरू केला. साईने 47 बॉलमध्ये 97 धावांची आक्रमक खेळी केली. तर साहाने 54 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पांड्याने 12 बॉलमध्ये 21 धावांचं मोलाचं योगदान दिलं आणि गुजरातची धावसंख्या 214 वर पोहोचवली. त्यानंतर पावसाने पुन्हा एकदा चेन्नईच्या बॉलिंगचा ख्वाडा केला आणि सर्वांची चिंता वाढवली होती.