IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सला 'जोर का झटका', गंभीरनंतर 'या' दिग्गजाने सोडली साथ

Lucknow Super Giants : आगामी आयपीएल हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला तगडा झटका बसला आहे. गौतम गंभीर याने लखनऊची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने लखनऊला रामराम ठोकलाय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 2, 2024, 08:24 AM IST
IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सला 'जोर का झटका', गंभीरनंतर 'या' दिग्गजाने सोडली साथ title=
Lucknow Super Giants

Vijay Dahiya has parted with LSG : यंदाच्या आयपीएल 17 व्या हंगामासाठी (IPL 2024) आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर तगडी बोली लावण्यात आल्याने यंदाचा हंगाम अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे. अशातच आता आयपीएलमध्ये मागील दोन हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) मोठा धक्का बसला आहे. आयपीएल ऑक्शनआधीच गौतम गंभीरने संघाची साथ सोडली होती. मात्र, आता आणखी एका दिग्ग्जाने लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडली आहे.

लखनऊ सुपर जायंट्ससोबत 2 वर्ष सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या विजय दहीया (Vijay Dahiya) यांनी संघासोबत फारकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. निरोप घेण्याचा वेळ आली आहे, लखनऊ सुपर जायंट्स टीमसोबत गेली 2 वर्ष काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. टीमला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं म्हणत विजय दहीया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये सुरूवातीपासून विजय दहीया यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र, फ्रँचायजीने त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी टीम इंडियाचे माजी कोच श्रीधरन श्रीराम यांची नियुक्ती केली आहे. गौतम गंभीरने महिनाभर आधीच कोलकाता नाईट रायडर्ससोबत करारबद्ध झाला आहे. अशातच आता केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. मागील दोन्ही हंगामात लखनऊने सेमीफायनलसाठी क्वालियाफ केलं होतं. त्यामुळे आता केएल राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.

लखनऊ सुपर जायंट्स : अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, के. गौथम, केएल राहुल, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक.

नवे खेळाडू : शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.