GT vs DC Live Score, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा, गुजरातवर 6 विकेटांनी सोपा विजय

आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघं युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. 

GT vs DC Live Score, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा, गुजरातवर 6 विकेटांनी सोपा विजय

Gujarat Titans vs Delhi Capitals Live Score in Marathi: अहदाबादच्या मैदानावर आज गुजरातसमोर, दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स ही 6 अंकांसोबत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचे प्रदर्शन या वर्षी एवढे खास नसल्यामुळे ते 4 अंकांसोबत 9 व्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, दिल्लीचा संघ आज आपल्या मागील मॅचमध्ये तगड्या राजस्थान रॉयल्सला पराभूत करणाऱ्या गुजरात टायटन्ससमोर आव्हान उपस्थित करू शकणार का?

17 Apr 2024, 20:23 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा पार्ट टाइम गोलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने अभिनव मनोहरला 8 धावांवर बाद केलं आहे. पाचव्या विकेटनंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून शाहरूख खान हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 19:59 वाजता

5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 30-4 असा आहे. इशांत शर्माच्या पाचव्या ओव्हरमध्ये साई सुदर्शन हा 12 धावांवर रन आउट, तर डेविड मिलर 2 धावांवर आउट झाला आहे. चौथ्या विकेटनंतर राहूल तेवतिया हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 19:53 वाजता

चौथ्या ओव्हरमध्ये मुकेश कुमार गूजरातला आणखी एक झटका दिला आहे. गुजरातचा अनुभवी फलंदाज वृद्धिममान साहाला फक्त 2 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर धाकड फलंदाज डेविड मिलर हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 19:47 वाजता

इशांत शर्माच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, गुजरात टायटन्सला खूप मोठा धक्का लागला आहे. गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल हा केवळ 8 धावांवर बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आला आहे.

17 Apr 2024, 19:05 वाजता

GT vs DC टॉस अपडेट - दिल्ली कॅपिटल्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

DC प्लेइंग 11 -

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (W/C), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद

GT प्लेइंग 11 - 

शुभमन गिल (C), रिद्धिमान साहा (W), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर

17 Apr 2024, 17:48 वाजता

GT vs DC head to head -

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड बघितला तर, या दोघांमध्ये गुजरात टायटन्सचे पारडं जड आहे. गुजरातने दिल्ली कॅपिटल्सला 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात पराभूत केलं आहे. तर दिल्लीने एका सामन्यात बाजी मारली आहे. तर दोघं संघांच्या क्रिकेट फँन्सची नजर आजच्या होणाऱ्या सामन्यावर असणार, आजच्या सामन्यात अजून एक महत्वाची गोष्ट असणार की, कोणता युवा कर्णधार आपल्या संघाला विजयी रेखा पार करून देतो.