WTC Final 2023 India Playing 11: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यासाठी आता फक्त 1 दिवस बाकी आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. मात्र, क्रिकेटप्रमींना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे प्लेइंग 11 ची. टीम इंडिया कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार? कसा असेल भारतीय संघ? यावर तुफान चर्चा होताना दिसते. अशातच माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी देखील त्याच्या अनुभवानुसार सामन्यासाठी प्लेइंग 11 कागदावर मांडली आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे. 2021 मध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर WTC चॅम्पियन बनण्याची सुवर्णसंधी आहे. भारतासमोर विकेटकीपर निवडीचा पेच निर्माण झालाय, कारण इशान किशन किंवा केएस भरत यापैकी एकाची निवड करावी लागेल, असं गावस्कर म्हणतात.
सुनिल गावस्कर यांच्या प्लेइंग 11 नुसार, स्पीन गोलंदाजीची धुरा अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांच्याकडे असेल. वेगवान गोलंदीजीसाठी गावस्कर यांनी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या तीन गोलंदाजांची निवड केली आहे गावस्करांनी मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि उमेश यादवला बाहेर बसवलं आहे. गावस्कर यांनी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरवर विश्वास दर्शविला आहे.
सुनिल गावस्कर यांच्या प्लेइंग 11 नुसार, ओपनिंगला रोहित शर्मा आणि शुभमन गिल येतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे खेळतील. लिटिल मास्टर यांनी त्याच्या प्लेइंग 11 मध्ये केएस भरतचा समावेश केला आहे. त्यानुसार केएस भरत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि जडेजा आणि रविचंद्रन अश्विन 7 आणि 8 व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतात. 9, 10 आणि 11 क्रमांकावर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर असतील.
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.