यॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो!

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Updated: Nov 1, 2017, 08:11 PM IST
यॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो! title=

कोलंबो : श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आधुनिक क्रिकेटमधला यॉर्करचा बादशहा म्हणून मलिंगाला ओळखलं जातं. पण श्रीलंकेमधल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मलिंगानं चक्क ऑफ स्पिन बॉलिंग टाकली आहे. एवढच नाही तर ऑफ स्पिन बॉलिंग टाकून मलिंगानं प्रतिस्पर्धी टीमच्या ३ विकेटही घेतल्या.

एमसीए ए डिव्हिजनच्या फायनलमध्ये मलिंगा टिजय लंका या टीमचं नेतृत्व करत होता. एलबी फायनान्सविरुद्धच्या या मॅचमध्ये मलिंगाच्या टीमचा ८२ रन्सनं विजय झाला.

पायाच्या दुखापतीनंतर १९ महिन्यांनी क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं. पण भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता न आल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी मलिंगाला वगळण्यात आलं होतं.

पाहा मलिंगाची ऑफ स्पिन बॉलिंग