LIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे

Updated: Nov 1, 2017, 07:33 PM IST
LIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात title=

दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या ६ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता भारताचा स्कोअर ४६ रन्स एवढा झाला आहे.

या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या आशिष नेहराला या मॅचमध्ये संधी देण्यात आली आहे. वनडे सीरिज २-१नं जिंकल्यानंतर आता टी-20 सीरिजही खिशात टाकण्यासाठी कोहली ब्रिगेड मैदानात उतरली आहे.

भारतीय टीम : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, युझुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा