Pat Cummins प्रेमात पडली जूही चावलाची मुलगी? KKR कडे जान्हवीची खास मागणी

जान्हवी मेहताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत पॅट कमिन्सच्या खेळीचं कौतुक केलं आहे. 

Updated: Apr 8, 2022, 09:58 AM IST
Pat Cummins प्रेमात पडली जूही चावलाची मुलगी? KKR कडे जान्हवीची खास मागणी title=

मुंबई : मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळलेल्या तुफान फलंदाजीमुळे पॅट कमिन्सची सगळीकडे चर्चा होतेय. कमिन्सच्या या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स विरूद्धचा सामना जिंकला. टीमचा मालक शाहरूख खान देखील पॅट कमिन्सच्या खेळीवर फार खूश आहे. असंच असताना केकेआरची सहमालकीण जूही चावला हिची मुलगी जान्हवी मेहताही स्वतःला रोखू शकलेली नाही. 

जान्हवी मेहताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत पॅट कमिन्सच्या खेळीचं कौतुक केलं आहे. दरम्यान या पोस्टमुळे केकेआरचे चाहत्यांनी जान्हवी पॅट कमिन्सच्या प्रेमात असल्याचं म्हटलंय.

7 एप्रिल रोजी जान्हवीने ही स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये जान्हवी म्हणते, मला नाही वाटत मी बाकी दिवस बोलू शकेन. मी पूर्णपणे स्तब्ध आहे. केकेआर कृपया मला माझ्या हृदयासाठी रिप्लेसमेंट पाठवा.

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने स्वतःच्या अधिकृत ट्विट हँडलवरून ही पोस्ट केली आहे. याने फॅन्सचं मनंही जिंकून घेतलं आहे. जान्हवी सुरुवातीपासून लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करते. त्यामुळे फार क्वचित वेळा ती चर्चेचा विषय बनते. 

मुंबई विरूद्धच्या सामन्यात केकेआरकडून फास्ट गोलंदाज पॅट कमिन्स 7 व्या नंबरवर खेळण्यासाठी उतरला होता. मैदानावर उतरताच पॅटने तुफान त्याच्या तुफान फलंदाजीला सुरुवात केली. पॅटने 15 चेंडूत 6 खणखणीत सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. यामुळे केकेआरला विजय मिळवणं सोपं झालं.