AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?

Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Jun 13, 2024, 04:12 PM IST
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो? title=
Australia vs Namibia T20 World Cup

ICC Rules for Lost on purpose : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अखेरच्या साखळी सामन्यांना आता सुरूवात झाली आहे. जवळपास सर्व संघांनी किमान दोन सामने खेळले असून टीम इंडिया, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने सुपर 8 मध्ये जागा निश्चित केलीये. तर उरलेल्या संघात थरार पहायला मिळतोय. अशातच आता ग्रुप बी मधील समीकरण अधिकच रोमांचक झालंय. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले असून 6 गुण नावावर केलेत. पण आता ऑस्ट्रेलिया इंग्लंडला वर्ल्ड कपमधून बाहेर  काढण्याचं स्वप्न पाहू लागलाय. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (josh hazelwood) याने केलेल्या वक्तव्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिशेल मार्श (Mitchell Marsh) याच्यावर बॅन लावला जाऊ शकतो. 

नामिबियाला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याने पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्याने इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर टाकण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडकडून पराभव सहन करेल असं धक्कादायक वक्तव्य केलंय. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलिया खरंच जर स्कॉटलँडकडून पराभूत झाली तर आयसीसीच्या नियमांनुसार ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनवर बंदी लागण्याचं सावट आहे.

ऑस्ट्रेलियाने जर मुद्दामहून हरण्याचा निर्णय घेतल्यास कॅप्टन मार्शला त्यांच्या तीन सुपर 8 सामन्यांपैकी 2 सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते. त्याच्यावर आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.11 अंतर्गत आरोप लावले जाऊ शकतात. इंग्लंड देखील या वक्तव्यावर आक्षेप घेऊ शकते. त्यामुळे आता हेझलवूडच्या एका वक्तव्यामुळे आता मिशेल मार्शचं टेन्शन वाढलंय. मात्र, ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडचा पराभव करेल, असा विश्वास इंग्लंडच्या कोचने म्हटलं आहे.

दरम्यान, मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपच्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलँडविरुद्ध पराभव पत्करण्यास काहीही हरकत नाही. असं जर झालं तर इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर होईल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन टीम पेनने केलं होतं. 16 जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यात सामना खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलियाचा संघ - मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.