ENG vs NZ : जो रुटने शोधून काढला 'रिव्हर्स सुपला', शॉट पाहून ट्रेंट बोल्टही झाला थक्क; पाहा Video

England vs New Zealand : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप (CWC 2023) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जो रूटने कमालीचा शॉट खेळला.

Updated: Oct 5, 2023, 06:50 PM IST
ENG vs NZ : जो रुटने शोधून काढला 'रिव्हर्स सुपला', शॉट पाहून ट्रेंट बोल्टही झाला थक्क; पाहा Video title=
ENG vs NZ, Joe Root Video

ENG vs NZ, Joe Root Video : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात (England vs New Zealand) प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 50 ओव्हरमध्ये 282 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूट (joe root) याने सर्वाधिक 77 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) 43 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 282 धावा करता आल्या. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 283 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे आता न्यूझीलंड मागील वर्ल्ड कप (World Cup 2023) फायनलचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.
 
इंग्लंडची पहिल्याच सामन्यात सुरूवात खराब झाली. डेव्हिड मलान 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर जो रूट अन् बेअरस्टोने डाव सांभाळला. त्यावेळी जो रूटने खेळलेला एक शॉट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जो रूटने अॅशेशमधील रिव्हर्स स्विपची मालिका वर्ल्ड कपमध्ये देखील सुरू ठेवलीये. मात्र, बॉल फाईन लेगच्या दिशेने उचलला गेल्याने नेटकऱ्यांनी याला रिव्हर्स सुपला शॉट असं नाव दिलंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, जो रूटच्या 77 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 9 विकेट गमावत 282 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 तर ग्लेन फिलिप आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 2 बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.