अखेर किंग कोहलीने सचिनचा रेकॉर्ड मोडलाच, विराटने झळकवलं 46 वं शतक, पाहा Video

(IndvsSl 3rd ODI) विराट कोहलीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

Updated: Jan 15, 2023, 06:44 PM IST
अखेर किंग कोहलीने सचिनचा रेकॉर्ड मोडलाच, विराटने झळकवलं 46 वं शतक, पाहा Video title=

Virat Kohli 47 Century : भारत आणि श्रीललेकंमधील (IndvsSl 3rd ODI) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं रन मशिन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने कारकिर्दीतील 46 वं शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. (Virat Kohlis 47th century breaks Sachin Tendulkars record latest marathi Sport News)

भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके कररण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 20 शतके केली आहेत तर आजच्या शतकासह कोहलीने कारकिर्दीतील 46 वं शतक करत मायदेशात 21 शतक ठोकलं आहे. विराटने 100 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सचिनने 160 डावांमध्ये 20 शतके केली होतीत.

भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय (IND vs SL) सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. निर्धारित 50 षटकात 391 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहली नाबाद 166 (Virat Kohli Century) आणि शुभमन गिल 116 यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा टप्पा पार केला. पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेच्या संघाला हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान असणार आहे. 

 दरम्यान, श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांना भारतीय बॅटर्सनी चांगलंच झोडलं. लाहिरू कुमाराने 10 षटकात 87 आणि कसुन राजिथाने 81 धावा देत प्रत्येकी 2 गडी बाद केले.  चमिका करूणारत्नेने एक गडी बाद केला. इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आलं नाही