'या जगात असं कोणीच नाही जो...', जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, 'कोणामध्ये हिंमत नाही की...'

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. 

शिवराज यादव | Updated: Aug 30, 2024, 06:48 PM IST
'या जगात असं कोणीच नाही जो...', जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, 'कोणामध्ये हिंमत नाही की...' title=

भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून जसप्रीत बुमराह आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचा संघर्ष अनेक नवख्या गोलंदाजांसाठी प्रेरणा ठरत आहे. योग्य वेग, अचूक वेध आणि अनोखी गोलंदाजीची स्टाईल यासह त्याने शून्यापासून ते यशाचं शिखर गाठण्यापर्यंतचा धक्क करणारा प्रवास केला आहे. 

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं यश म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम गोलंदाजी करत सामन्य़ाचं चित्र पालटण्याची ताकद त्याच्यात आहे. टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याने आपण किती सक्षण आहोत हे सिद्ध केलं आहे. डेथ ओव्हर्समधील त्याचे यॉर्कर फलंदाजांनी धडकी भरवणारे असतात. अनेक संघाचे दिग्गज खेळाडू बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना मात्र अडखळताना दिसतात. 

पण जगात असा कोणता फलंदाज आहे का ज्याची भीती जसप्रीत बुमराहला वाटत असेल? स्वत: बुमराहने एका सार्वजनिक कार्यक्रमात या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. जगात असा कोणता फलंदाज आहे का ज्याला गोलंदाजी करणं तुला आव्हानात्मक वाटतं? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर बुमरहान अत्यंत नम्र आणि चालाखीने उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवून कौतुक केलं. 

“हे बघ मला चांगलं उत्तर द्यायचं आहे, पण मला माझ्या मनात एखाद्याचं नाव यावं असं वाटत नाही.  कारण साहजिकच मी सगळ्यांचा आदर करतो. पण माझ्या मनात मी स्वतःला सांगतो की जर मी माझं काम चांगल्य़ा पद्दतीने केलं तर जगात कोणीही मला रोखू शकत नाही,” असं बुमराह म्हणाला.

"त्यामुळे मी माझ्या समोर किंवा विरोधात कोण आहे यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रीत करतो. जर मी स्वत:ला सर्वोत्तम संधी दिली तर माझं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असेल. इतर गोष्टी स्वत:ची काळजी योग्य प्रकारे घेतील. म्हणजे फलंदाजाला ताकद देण्यापेक्षा आणि तो माझ्यापेक्षा चांगला होण्याची संधी देण्याचा प्रयत्न मी करणार नाही," असं बुमराह म्हणाला.

T20 विश्वचषक विजयात बुमराहचा मोठा वाटा असून, भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. या वेगवान गोलंदाजाने केवळ 4.17 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली, जी संपूर्ण स्पर्धेत 20 पेक्षा जास्त षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वात कमी होती. त्याने 15 विकेट्स घेतल्या. यामुळे त्याचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानही करण्यात आला.