जेम्स अंडरसन थोडक्यात बचावला, तोंडावर आदळला चेंडू

 भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा रोमहर्षक विजय झाला.

Updated: Aug 6, 2018, 04:31 PM IST
जेम्स अंडरसन थोडक्यात बचावला, तोंडावर आदळला चेंडू title=

लंडन : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा रोमहर्षक विजय झाला. या मॅचमध्ये इंग्लंडनं भारताचा ३१ रननी पराभव केला. आता ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन थोडक्यात बचावला आहे. स्टुअर्ट ब्रॉडसोबत गोल्फ खेळत असताना अंडरसनच्या तोंडावर चेंडू आदळला त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. अंडरसननं मारलेला शॉट एका झाडावर लागला आणि चेंडू पलटी मारून तोंडावर लागला. जेम्स अंडरसनला झालेल्या दुखापतीचा हा व्हिडिओ स्टुअर्ट ब्रॉडनं ट्विटरवरून शेअर केला आहे. 

९ ऑगस्टपासून दुसरी टेस्ट

भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्टला ९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मॅचआधी इंग्लंडनं टीममध्ये बदल केले आहेत. डेव्हिड मलानऐवजी २० वर्षांच्या ओली पोपला टीममध्ये घेण्यात आलंय. तर ऑल राऊंडर बेन स्टोक्स या मॅचला मुकणार आहे. सरेकडून खेळणारा पोप काऊंटी चॅम्पियनशीप-१ डिव्हिजनमध्ये दुसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. याचबरोबर युवा बॉलर जेमी पॉर्टर, क्रिस वोक्स आणि मोईन अलीचीही निवड करण्यात आलीये.

इंग्लंडची टीम

जो रूट, मोईन अली, जेम्स अंडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, एलिस्टर कूक, सॅम कुरेन, किटन जेनिंग्स, ओली पोप, जेमी पॉर्टर, आदिल रशीद, क्रिस वोक्स