मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) टीम इंडियाच्या टी 20 क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायउतार होणार आहे. विराटने याबाबतची घोषणा ही या टी 20 वर्ल्ड कपआधीच केली होती. विराटच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. विराटच्या या निर्णायमुळे आजी माजी क्रिकेटपटू हैराण झाले. तेव्हापासून विराटने हा एकाएकी असा निर्णय का घेतला, अशी चर्चा क्रिकेटविश्वात रंगू लागली. याबाबतीत बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. (It was Virat Kohlis decision to step down from T20 captaincy and the board did not put any pressure on him, says sourav ganguly)
कॅप्ट्न्सी सोडण्यासाठी विराटवर बीसीसीआयचा दबाव?
टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्ट्न्सी सोडण्याचा निर्णय हा विराटचा होता. त्यासाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नव्हता. "मी यामुळे हैराण होतो. विराटने बहुतेक इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर हा निर्णय घेतला होता. हा पूर्णपणे विराटचा निर्णय होता. आम्ही ना त्याच्याशी या विषयावर काही बोललो किंवा त्याच्यावर दबाव टाकला. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाहीत. मी पण खेळाडू होता. त्यामुळे मी असं कधी करणार नाही", असं गांगुलीने स्पष्ट केलं.
"तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्ट्नसी करणं सोपं नाही"
"आता मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. इतक्या मोठ्या काळापासून तिन्हा फॉर्मेटमध्ये कॅप्ट्न्सी करणं सोपं नाही. मी स्वत:ही 5 वर्ष कॅप्टन राहिलो आहे. कर्णधारपदासह मान-सन्मान मिळतो. मात्र खेळाडू हा मानसिक आणि शारिरीकरित्या थकून जातो. ही बाब धोनी किंवा गांगुलीबद्दल नाही. भविष्यात होणाऱ्या कर्णधारांनाही हा दबाव जाणवेल. हे सोपं काम नाही", असं गांगुली म्हणाला.
असा आहे रेकॉर्ड
विराटचा कर्णधार म्हणून टी 20 क्रिकेटमधील रेकॉर्ड शानदार आहे. विराटने एकूण 45 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी27 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर 14 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 4 सामने हे बरोबरीत सुटले आहेत. कॅप्ट्न्सी सोडण्याचा निर्णय मी माझ्या जवळच्या लोकांशी बोलून घेतला होता. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्माचा समावेश होता.