T20 world cup मध्ये पाकिस्तान विरुद्ध या भारतीय खेळाडूने बनवले सर्वाधिक नाबाद रन्स

ICC T20 World cup 2021 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे.

Updated: Oct 23, 2021, 06:00 PM IST
T20 world cup मध्ये पाकिस्तान विरुद्ध या भारतीय खेळाडूने बनवले सर्वाधिक नाबाद रन्स title=

दुबई : भारतीय क्रिकेट संघ (Team India) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ICC T20 World cup 2021 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे आणि हा सामना जिंकून आपल्या मोहिमेची सर्वोत्तम सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पाकिस्तानविरुद्धच्या (Ind vs Pak) या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर लागल्या असल्या तरी ज्या खेळाडूवर सर्वाधिक लक्ष असेल ते म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली. (Most runs against Pakistan by Indian player in T20WC)

सर्वांच्या नजरा कोहलीवर टिकून राहण्यामागे काही खास कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे कर्णधार म्हणून, तो कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन या संघाविरुद्ध मैदानात उतरतो. दुसरे म्हणजे, टी-20 विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून (Pakistan Team) एकदाही हरला नाही, तर विराट कोहली ही परंपरा पुढे चालू ठेवू शकेल का? तिसरे म्हणजे, एक फलंदाज म्हणून विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात या संघाविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकात नेहमीच चांगली खेळी साकारली आहे आणि तो नाबाद परतला आहे, त्यामुळे तो यावेळीही त्याच्या संघासाठी चांगली खेळी खेळू शकतो.

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन डाव खेळले आहेत. 2012 मध्ये त्याने या संघाविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. यानंतर, 2014 मध्ये त्याने 32 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या, तर 2016 मध्ये त्याने 37 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. म्हणजेच टी-20 विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 130 चेंडूत नाबाद 169 धावा केल्या आहेत आणि तो नाबाद राहिला आहे. पाकिस्तानचा एकही गोलंदाज त्याला आऊट करू शकलेला नाही. याशिवाय, तो टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू-

169 - विराट कोहली

75 - गौतम गंभीर

64 - रोहित शर्मा

59 - युवराज सिंग

58 - रॉबिन उथप्पा