बालपण सर्वांचं सारखंच असतं! ईशांत शर्माला पण खायला लागले होते फटके

'त्या दिवशी मला फूटबॉल झाल्याचा फील आला', ईशांत शर्मानं सांगितला किस्सा

Updated: May 18, 2021, 05:28 PM IST
बालपण सर्वांचं सारखंच असतं! ईशांत शर्माला पण खायला लागले होते फटके title=

मुंबई: लहानपणे काहीतरी उद्योग केले किंवा शाळेत सुद्धा बऱ्याच ठिकाणी चुका केल्या की पडके पडायचे. सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटर्स बालपण सर्वांचं एकसारखंच असतं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचं बालपणही असंच होतं. त्याने आपल्या आयुष्यातला एक खास मजेशीर किस्सा शेअर केला आहे. 

ईशांत शर्मानं एका मुलाखतीदरम्यान आईकडून खाल्लेला मार कधी विसरणार नाही असं सांगितलं होतं. 'माझ्या आईनं मला क्लासला जाण्यासाठी सांगितलं. मला तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी क्लास चुकवून सरळ मित्राचं घर गाठलं.'

'क्लासमध्ये जाणं आवडत नसल्यानं मी सरळ मित्राच्या घरी किंवा क्लास बुडवून जात असे. एक दिवस आई माझ्या मागे क्लासची फी भरण्यासाठी आली. तेव्हा आईच्या लक्षात आलं की ईशांत क्लासमध्ये आला नाही. रोज क्लासाठी घरातून निघतो पण क्लासमध्ये पोहोचत नाही.' 

'माझा क्लास दुपारी 2 वाजता असायचा. मी मित्राच्या घरून तीन ते साडेतीनच्या आसपास निघायचो आणि सरळ घर गाठायचो. त्या दिवशी आईनं विचारलं काय शिकवलं आज क्लासमध्ये? मी शाळेत शिकवलेल्या गोष्टी आईला सांगितल्या. त्यावेळी माझ्या कानशिलात जोरात बसली. बाबा घरात टीव्ही बघत होते पण मध्यस्ती केली नाही. त्यादिवशी एक क्षण असं वाटलं आई माझ्यासोबत फूटबॉल खेळते आहे.' 

ईशांत शर्माने टेस्टमध्ये 101 सामने खेळून 303 विकेट्स घेतल्या आहेत. वन डेचे 80 सामने खेळून 115 तर टी 20चे 14 सामने खेळून 8 विकेट्स घेतल्या आहेत. ईशांत शर्मा आयपीएलमध्ये 93 सामने खेळला आहे. त्यामध्ये 72 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.