IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...

World Cup 2023 IND vs AUS Final :  एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 18, 2023, 06:13 PM IST
IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या... title=
World Cup 2023 IND vs AUS Final Ishan Kishan's mother

Ishan Kishan's mother : सर्वांना ज्याची उत्सुकता लागली होती, तो दिवस आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) हा सामना दुपारी 2 पासून खेळवला जाईल. टीम इंडियाने वर्ल्ड कपवर (World Cup 2023) नाव कोरावं, यासाठी देशभर पुजा आणि दुवा केल्या जात आहेत. अशातच आता इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) लाडक्या लेकासाठी आणि टीम इंडियावर मोठं वक्तव्य केलं आहे. 

Ishan Kishan चे वडील म्हणतात...

माझा मुलगा आज टीम इंडियामध्ये आहे, याचा मला गर्व आहे. माझा मुलगा प्लेइंग इलेव्हनमध्ये असो वा नसो, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा. संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. फायनलमध्ये देखील सर्वांनी दमदार कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकावा, अशी इच्छा इशान किशनच्या वडिलांनी (Ishan Kishan's Father) व्यक्त केली आहे.

आई म्हणते 'माझ्या लेकाने...'

इशानला फिल्डिंग करताना पाहून मला खूप आनंद झाला. त्याला फायनलमध्ये संधी मिळेल की नाही, हे आता टीम मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो. त्याने खूप चांगली कामगिरी केलीये. 15 जणात त्याचं नाव आलं, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा यासाठी छठपुजेचं आयोजन केल्याची माहिती देखील इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) दिली आहे.

Ishan Kishan म्हणतो...

जेव्हा मी वर्ल्ड कपसाठी तयारी करत होतो, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलंय, तुला वर्ल्ड कप जिंकवायचा आहे, तोही कोणत्याही किंमतीत... त्यामुळे माझ्यावर आता अतिरिक्त प्रेशर असेल, असं इशान किशन याने वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं. इशान किशनला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात इशानला संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. इशान शुन्यावर बाद झाला होता.