विराटने 'तो' सल्ला दिला अन् मी..., इशानने सांगितलं डबल सेंच्युरीचं गुपित!

सामना झाल्यावर ईशानने डबल सेंच्युरीमागचं गुपित सांगितलं आहे. (Ind vs ban Ishan Kishan Double Hundred)

Updated: Dec 10, 2022, 10:54 PM IST
विराटने 'तो' सल्ला दिला अन् मी..., इशानने सांगितलं डबल सेंच्युरीचं गुपित! title=

Ishan Kishan secret of double century : भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. या सामन्यात युवा खेळाडू ईशान किशनने द्विशतक (Ishan Kishan double century) मारत मोठा विश्वविक्रम केला आहे. ईशान आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 290 धावांची भागीदारी केली आहे. विराटच्या शतकी आणि ईशानच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने 409 धावांचा डोंगर उभारला. ईशान मिळालेल्या संधीचा फायदा उचलत उपयुक्तता दाखवून दिली. सामना झाल्यावर ईशानने डबल सेंच्युरीमागचं गुपित सांगितलं आहे.  (Ishan Kishan told the secret of double century Ind vs Ban latets marathi sport news)

मला 95 धावांवर असताना षटकार मारून शतक पूर्ण करायचं होतं. त्यावेळी, तुझं पहिलं शतक आहे, कोणतीही रिस्क न घेता एकेरी आणि दुहेरी धाव घेत शतक पूर्ण कर असं विराटने सांगितल्याचं ईशानने सांगितलं. ईशानने  शतक पूर्ण केल्यावर काही ब्रेक घेतला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवून टाकला. 

ईशानने अवघ्या 126 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या तर एकूण 210 धावा केल्या. या दमदार खेळीमध्ये ईशानने 24 चौकार आणि 10 षटकार खेचले. ईशान किशनने हा द्विशतक मारत इतिहास रचताना वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला देखील मागे टाकलं आहे. गेलने 138 बॉल्समध्ये त्याचं द्विशतक पूर्ण केलं होतं. तर किशनने केवळ 126 बॉल्समध्ये ही कामगिरी केल्याने तो गेलचा रेकॉर्ड मोडला आहे. 

दरम्यान, ईशान किशनने द्विशतक मारत इतिहास रचताना वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला देखील मागे टाकलं आहे. गेलने 138 बॉल्समध्ये त्याचं द्विशतक पूर्ण केलं होतं. तर किशनने केवळ 126 बॉल्समध्ये ही कामगिरी केल्याने त्याने गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.